बाळ मान कधी धरते?

Avatar
लोड होत आहे...

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

Warning:  Undefined variable $logged_name in /home/votsisid/qary.in/no-answer-block.php on line 7

तुम्ही उत्तर देण्यास मदत करू शकता?

संबंधित प्रश्न: बाळाला बाळसे येण्यासाठी काय उपाय करावे?

बाळाचे आरोग्य आणि त्याची वाढ ही त्याच्या आईवडिलांसाठी  अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या बाळाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. यासाठी मी काही उपाय सांगितले आहेत ते जरूर करून पहा.

1. स्तनपान करणे.

बाळाला बाळसे येण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्तनपान. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळ अधिक सुदृढ  होण्यास सुद्धा मदत होते.  किमान सहा महीने बाळाला स्तनपान करावे आणि त्यानंतर त्याला पोषक आहार द्यावा.

2. बाळाला तेल मालिश करणे.

बाळाला दररोज तेलाने मालिश करणे खूप फायदेशीर ठरते. तेल मालिश केल्याने बाळाच्या त्वचेला पोषण आणि हाडांना मजबूती येते. यामध्ये नारळाचे तेल, तिळाचे तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करावा.

• नारळाच्या तेलामध्ये बाळाच्या त्वचेसाठी उत्तम असते. हे नैसर्गिक आणि हायपोअलर्जेनिक आहे, त्यामुळे बाळाच्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
• तिळाच्या तेलामध्ये हाडांच्या मजबुतीसाठी चांगले असते. यामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतात.
• बदामाच्या तेलात बाळाच्या त्वचेसाठी फायदेशीर असे व्हिटॅमिन डी आणि इ असते.

तेल मालिश करताना तेल हलकसं गरम करा आणि बाळाच्या शरीरावर हलक्या हाताने मालिश करा यामुळे बाळाला आराम मिळतो आणि त्याला चांगली झोपही लागेल.

3. बाळाला पोषक आहार द्यावा

बाळाच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे.

• आईचं दूध: पहिल्या सहा महिन्यांत बाळाला फक्त आईचं दूध द्याव. आईच्या दुधात सर्व आवश्यक पोषक तत्व असतात जे बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असतात.
• तुप: तुप पचायला हलके आणि पोषक असते. तुपामुळे बाळाचे पचन सुधारते आणि वजन वाढते.
• फळांचा रस: ६ महिन्यांनंतर बाळाच्या आहारात ताज्या फळांचे रस उदाहरणार्थ सफरचंद, संत्रे रस  द्यावा. यामुळे बाळाच्या शरीराला आवश्यक व्हिटॅमिन्स मिळतील.
• भाज्या: ६ महिन्यांनंतर बाळाच्या आहारात उकडलेल्या भाज्या उदाहरणार्थ गाजर, पालक, बीट या भाज्या समाविष्ट कराव्यात.

4. सुंठीचा लेप पोटावर लावावा किंवा बेंबीच्या बाजूला हिंग ओला करून लावावा.

सुंठीचा लेप बाळाच्या पोटावर लावल्याने पोटातील वायू कमी होतो आणि बाळाला आराम मिळतो. सुंठीचा लेप तयार करण्यासाठी सुंठ आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करावी आणि पोटावर हलकसं लावावे. तसेच हिंग हातावर ओला करून बेंबीच्या बाजूला लावल्यास आराम मिळतो.

5. गरम पाण्याने अंघोळ घालावी.

बाळाला गरम पाण्याने रोज अंघोळ घालावी. गरम पाण्याने अंघोळ केल्याने बाळाच्या त्वचेला पोषण मिळते, त्वचा स्वच्छ राहते आणि बाळाला आराम मिळतो.

6. चांगली झोप मिळणे

बाळाला पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपेत बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होते. बाळाला शांत आणि मंद प्रकाशमय खोलीत झोपवावे आणि त्याच्या झोपेची नियमितता म्हणजेच वेळ ठेवावी.

7. ताजी हवा देणे.

बाळाला रोज थोडावेळ घराबाहेर शुद्ध हवेत घेऊन जा. शुद्ध हवेतून बाळ ताजेतवाने  होईल.

9. वैद्यकीय सल्ला (महत्वाचा)

सर्वात महत्वाचे, कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्यास किंवा नवीन काही उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...