बाळाचे आरोग्य आणि त्याची वाढ ही त्याच्या आईवडिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. आपल्या बाळाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी ते कुठल्या न कुठल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. यासाठी मी काही उपाय सांगितले आहेत ते जरूर करून पहा.
बाळाला बाळसे येण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे स्तनपान. स्तनपानामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे बाळ अधिक सुदृढ होण्यास सुद्धा मदत होते. किमान सहा महीने बाळाला स्तनपान करावे आणि त्यानंतर त्याला पोषक आहार द्यावा.
2. बाळाला तेल मालिश करणे.
बाळाला दररोज तेलाने मालिश करणे खूप फायदेशीर ठरते. तेल मालिश केल्याने बाळाच्या त्वचेला पोषण आणि हाडांना मजबूती येते. यामध्ये नारळाचे तेल, तिळाचे तेल किंवा बदामाच्या तेलाचा वापर करावा.
तेल मालिश करताना तेल हलकसं गरम करा आणि बाळाच्या शरीरावर हलक्या हाताने मालिश करा यामुळे बाळाला आराम मिळतो आणि त्याला चांगली झोपही लागेल.
बाळाच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे.
सुंठीचा लेप बाळाच्या पोटावर लावल्याने पोटातील वायू कमी होतो आणि बाळाला आराम मिळतो. सुंठीचा लेप तयार करण्यासाठी सुंठ आणि पाणी एकत्र करून पेस्ट तयार करावी आणि पोटावर हलकसं लावावे. तसेच हिंग हातावर ओला करून बेंबीच्या बाजूला लावल्यास आराम मिळतो.
बाळाला गरम पाण्याने रोज अंघोळ घालावी. गरम पाण्याने अंघोळ केल्याने बाळाच्या त्वचेला पोषण मिळते, त्वचा स्वच्छ राहते आणि बाळाला आराम मिळतो.
बाळाला पुरेशी झोप मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. झोपेत बाळाची शारीरिक आणि मानसिक वाढ होते. बाळाला शांत आणि मंद प्रकाशमय खोलीत झोपवावे आणि त्याच्या झोपेची नियमितता म्हणजेच वेळ ठेवावी.
बाळाला रोज थोडावेळ घराबाहेर शुद्ध हवेत घेऊन जा. शुद्ध हवेतून बाळ ताजेतवाने होईल.
सर्वात महत्वाचे, कुठल्याही प्रकारच्या समस्या आल्यास किंवा नवीन काही उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. वैद्यकीय सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे जेणेकरून बाळाच्या आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही.
वाचणं सुरू ठेवा
सिझेरियन(शस्त्रक्रिया) नंतर मुख्यत्वे आईला शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही विशेष गोष्टीची काळजी घेण्यासाठी एक अधिक माणसाची गरज असते. सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर योग्य काळजी घेतल्यास तिच्या शरीराची कमतरता पटापट भरून निघू शकते. पण ही काळजी नेमकी घ्यायची कशी, तर यासाठी काही टिप्सचे पालन करावे लागेल.
आपण लवकरात लवकर यातून बरे व्हाल, अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?