कदाचित हा प्रश्न 'जखमेवर मीठ चोळणे' ह्या म्हणीवरून आला असावा| तर प्रश्नाचे उत्तर असे आहे कि ,
जखमेवर मीठ आणि मसाला(मिरची) दोन्ही झोंबतात, परंतु यामध्ये काही फरक आहे. मीठ म्हणजे सोडियम क्लोराइड आणि ते जखमांमध्ये गेल्यावर तीव्र वेदना उत्पन्न करतात. याचे कारण मीठ जखमेच्या संपर्कात आल्यावर ऑस्मोसिस प्रक्रियेमुळे जखमेमध्ये असलेल्या पेशींमधून पाणी बाहेर येते आणि त्यामुळे जखम आणखी दुखते.
आणि मसाल्याचे झाले तर यामध्ये प्रामुख्याने मिरची असते, जी त्वचेला जळजळ आणि वेदना देऊ शकतात. मिरचीतील कॅपसाइसिन नावाचे रसायन विशेषतः जळजळ उत्पन्न करते.
तर तुम्हाला समजलच असेल कि , जखमेवर मीठ आणि मसाला दोन्हीच तीव्र वेदना उत्पन्न करू शकतात.
वाचणं सुरू ठेवा
नावडतीचे मीठ अळणी ही मराठी म्हण आहे, ज्याचा अर्थ असा आहे की ज्याची आपल्याला आवड नाही, त्याच्याकडून काहीही चांगले वाटत नाही किंवा त्याच्या केलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये दोषच दिसतो.
शब्दशः अर्थ घ्यायचा म्हटलं तर अळणी म्हणजे स्वाद नसलेले आणि मीठ अळणी म्हणजे अगदीच चवहीन. येथे नावडतीचे म्हणजे ज्याला आपण आवडत नाही, त्याच्याबद्दल नेहमी नकारात्मक विचार असतो. त्याच्याद्वारे केलेल्या कोणत्याही गोष्टीत आपल्याला चांगुलपणा दिसत नाही.
आता आपल्याला अर्थ समजलाच असेल, अशी आशा करते.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?