पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर मुख्यतः एकच चिन्ह दिसून येते आणि ते भृगु ऋषींनी विष्णु भगवानांच्या छातीवर लाथ मारल्याचे आहे, ज्यामुळे भगवान विष्णुच्या छातीवर खोल खड्डा दिसून येतो. या प्रसंगाचे वर्णन हे भगवान विष्णुच्या सहनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
वाचणं सुरू ठेवा
भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक महान ऋषी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. भृगु ऋषींची आणि भगवान विष्णुच्या सहनशीलता, करुणा आणि श्रेष्ठता दर्शवते.
आता आपण भृगु ऋषींनी श्री विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुच्या छातीवर लाथ मारली या प्रसंगाबद्दल पाहुया.
काही ऋषींमध्ये देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल विवाद सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भृगु ऋषी यांना पाठविण्यात आले. भृगु ऋषींनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण भगवान ब्रह्मदेव क्रोधित झाले. त्यानंतर त्यांनी भगवान शिवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण शिवही क्रोधित झाले. अखेरीस, भृगु ऋषी विष्णु भगवानांकडे गेले.
भगवान विष्णु त्या वेळी लक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. भृगु ऋषीं संतप्त होऊन विष्णु भगवानांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. यावर विष्णु भगवान शांतपणे उठले आणि त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला, त्यांची चौकशी केली की त्यांच्या पायाला काही लागले तर नाही ना. विष्णु भगवानांचा हा विनम्र आणि सहनशील स्वभाव पाहून भृगु ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की विष्णु भगवान हेच सर्वात श्रेष्ठ देवता आहेत, कारण त्यांनी क्रोधाचे शांततेत रूपांतर केले.
या कथेवरून असे सिद्ध होते कि, भगवाना विष्णु हे सहनशीलता, करुणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. यामुळे भृगु ऋषींचाही अहंकार लोप पावला आणि भगवान विष्णु यांना श्रेष्ठ देवता मानले गेले.
धन्यवाद ! जर आपल्याला ही कथा आवडल्यास नक्की अपवोट करा.
वाचणं सुरू ठेवा
विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करतं. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.
धन्यवाद!!!
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?