विशेष कार्यकारी अधिकारी म्हणजे कोण त्यांचे काम काय असते?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

महेश ढेकळे
महेश ढेकळे
06 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?

छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे होते.  कान्होजी आंग्रे हे सामान्य कुटुंबातील होते, पर त्यांच्या चातुर्य आणि धाडसामुळे राजांनी त्यांना मराठा आरमाराचे प्रमुख बनविले. त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजाकडून होणारया सागरी आक्रमणांना रोखण्याचे काम केले . शिवाजी महाराजांच्या नौदल धोरणानुसार त्यांनी आरमाराची रचना केली, तसेच त्यांनी सागरी किल्ले बांधले. कान्होजी आंग्रे यांचे योगदान मराठा साम्राज्याच्या सागरी सामर्थ्याला अभूतपूर्व ऊंचीवर घेऊन गेले.

मराठा आरमाराने इंग्रज, पोर्तुगीज सारख्या बलाढ्य शत्रुना नेस्तनाभूत केले. त्यांच्या सागरी लढायांनी मराठा साम्राज्याचे सागरी वर्चस्व स्थिर झाले आणि तिथे व्यापारही होऊ लागला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यात कान्होजी आंग्रे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
महेश ढेकळे
महेश ढेकळे
05 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: काम सोडण्याचा अर्ज कसा लिहावा?

काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा. 

मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.

आता सुरुवात करूया,

प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.

दिनांक: अर्जाचा दिनांक

विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज

आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.

कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.

आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.

लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: भगवान विठ्ठलाच्या मूर्तीवर कोण-कोणती विशेष चिन्हे आहेत?

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर  मुख्यतः एकच चिन्ह दिसून येते आणि ते भृगु ऋषींनी विष्णु भगवानांच्या छातीवर लाथ मारल्याचे आहे, ज्यामुळे भगवान विष्णुच्या छातीवर खोल खड्डा दिसून येतो. या प्रसंगाचे वर्णन हे भगवान विष्णुच्या सहनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...