भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक महान ऋषी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. भृगु ऋषींची आणि भगवान विष्णुच्या सहनशीलता, करुणा आणि श्रेष्ठता दर्शवते.
आता आपण भृगु ऋषींनी श्री विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुच्या छातीवर लाथ मारली या प्रसंगाबद्दल पाहुया.
काही ऋषींमध्ये देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल विवाद सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भृगु ऋषी यांना पाठविण्यात आले. भृगु ऋषींनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण भगवान ब्रह्मदेव क्रोधित झाले. त्यानंतर त्यांनी भगवान शिवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण शिवही क्रोधित झाले. अखेरीस, भृगु ऋषी विष्णु भगवानांकडे गेले.
भगवान विष्णु त्या वेळी लक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. भृगु ऋषीं संतप्त होऊन विष्णु भगवानांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. यावर विष्णु भगवान शांतपणे उठले आणि त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला, त्यांची चौकशी केली की त्यांच्या पायाला काही लागले तर नाही ना. विष्णु भगवानांचा हा विनम्र आणि सहनशील स्वभाव पाहून भृगु ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की विष्णु भगवान हेच सर्वात श्रेष्ठ देवता आहेत, कारण त्यांनी क्रोधाचे शांततेत रूपांतर केले.
या कथेवरून असे सिद्ध होते कि, भगवाना विष्णु हे सहनशीलता, करुणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. यामुळे भृगु ऋषींचाही अहंकार लोप पावला आणि भगवान विष्णु यांना श्रेष्ठ देवता मानले गेले.
धन्यवाद ! जर आपल्याला ही कथा आवडल्यास नक्की अपवोट करा.
वाचणं सुरू ठेवा
सगळ्यात पहिले त्याच्या कानशिलात लगावेन आणि "तू काय समजतोस स्वतःला? माझ्या अंगाला हात लावायला काय तुझ्या आईवडिलांनी शिकवलंय का? आता हे कृत्य तुला महागात पडेल, कारण मी याची तक्रार पोलिसांत करणार आहे. पुन्हा असा मूर्खपणा केलास तर तुला याचे परिणाम भोगावे लागतील." असे भाष्य करेल.
वाचणं सुरू ठेवा
श्री अक्षरावरून मुला - मुलींची नावे आहेत, पण जितकी मिळाली तितकी आपल्या समोर आहेत, ती वाचा आणि त्यातील एखादे आवडले तर नक्की ठेवा.
वाचणं सुरू ठेवा
श्रीमंत या शब्दाला मराठीत समानार्थी शब्द "धनाढ्य," "संपन्न," "संपत्तीवान," "धनवान," किंवा "विभूतीमान" असा होतो. उदाहरणार्थ, धनाढ्य असण्याबरोबरच श्रीमंत माणसाने दानशूर असणे सुद्धा आवश्यक असते .
वाचणं सुरू ठेवा
पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर मुख्यतः एकच चिन्ह दिसून येते आणि ते भृगु ऋषींनी विष्णु भगवानांच्या छातीवर लाथ मारल्याचे आहे, ज्यामुळे भगवान विष्णुच्या छातीवर खोल खड्डा दिसून येतो. या प्रसंगाचे वर्णन हे भगवान विष्णुच्या सहनशीलतेचे प्रतीक म्हणून ओळखले जाते.
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?