छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केली?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

संबंधित प्रश्न

छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक प्रसंगी कोणती कालगणना सुरू केली? छत्रपती शिवाजी महाराज व शिवमुद्रा हा ग्रंथ कोणी लिहिला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल माहिती मिळेल का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली? छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुलं होती? छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक का केला? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती? छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे? छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक कोणी संपन्न केला? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
संबंधित प्रश्न: शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली?

छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या १६व्या वर्षी पुणे आणि आसपासच्या मावळ प्रदेशातून स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली.

१६४५ साली, अवघ्या १६ वर्षांचे असताना, त्यांनी पहिला किल्ला किल्ले तोरणा जिंकला आणि स्वराज्याचा पहिला पाया रचला. त्यानंतर राजगड, पुरंदर, रोहिडा असे किल्ले घेत स्वराज्याचा विस्तार केला.

लहान वयातच त्यांच्या अंगी धाडस, प्रचंड दूरदृष्टी आणि उत्तम नेतृत्वगुण होते आणि त्यामुळेच ते इतिहासातील महान शासक आणि योद्धा ठरले.

जय जिजाऊ | जय शिवराय ||

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलांची नाव काय होती?

लहान मुलाला जरी हा प्रश्न विचारला तरी तो त्यातील एक नाव सांगेल छत्रपती संभाजी महाराज आणि दुसऱ्या मुलाचे नाव राजाराम महाराज होते.

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला आणि त्यांच्या आईचे नाव सईबाई निंबाळकर होते. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाईंचे पुत्र होते. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि त्यांनी 1681 ते 1689 पर्यंत राज्य केले. त्यात त्यांनी मुघल साम्राज्याविरुद्ध अनेक लढाया लढल्या.

राजाराम महाराजांचा जन्म 24 फेब्रुवारी 1670 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव सोयराबाई होते. राजाराम महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी सोयराबाई यांचे पुत्र होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी मराठा साम्राज्याचे नेतृत्व केले आणि मुघलांविरुद्ध लढाया चालू ठेवल्या.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...