समाज घडवण्यात युवकांची जबाबदारी या विषयावर निबंध लिहा?

Avatar
लोड होत आहे...

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

नवीनतम फीड मिळवा?

महेश ढेकळे
महेश ढेकळे
05 औगस्ट 2024
संबंधित प्रश्न: काम सोडण्याचा अर्ज कसा लिहावा?

काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा. 

मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.

आता सुरुवात करूया,

प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.

दिनांक: अर्जाचा दिनांक

विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज

आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.

कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.

आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.

लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.


वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...
संबंधित प्रश्न: भृगु ऋषींनी श्री विठ्ठलाच्या छातीवरती लाथ का मारली होती?

भृगु ऋषी हे सप्तर्षींपैकी एक महान ऋषी होते. त्यांच्या नावाचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये आणि धार्मिक ग्रंथांमध्ये आढळतो. भृगु ऋषींची आणि भगवान विष्णुच्या सहनशीलता, करुणा आणि श्रेष्ठता दर्शवते.

आता आपण भृगु ऋषींनी श्री विठ्ठल म्हणजेच भगवान विष्णुच्या छातीवर लाथ मारली या प्रसंगाबद्दल पाहुया.

काही ऋषींमध्ये देवतांपैकी श्रेष्ठ कोण आहे याबद्दल विवाद सुरु झाला. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भृगु ऋषी यांना पाठविण्यात आले. भृगु ऋषींनी सर्वप्रथम ब्रह्मदेवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण भगवान ब्रह्मदेव क्रोधित झाले. त्यानंतर त्यांनी भगवान शिवांकडे जाऊन त्यांची परीक्षा घेतली, पण शिवही क्रोधित झाले. अखेरीस, भृगु ऋषी विष्णु भगवानांकडे गेले.

भगवान विष्णु त्या वेळी लक्ष्मीसमवेत विश्रांती घेत होते. भृगु ऋषीं संतप्त होऊन विष्णु भगवानांच्या छातीवर जोरदार लाथ मारली. यावर विष्णु भगवान शांतपणे उठले आणि त्यांनी भृगु ऋषींना नमस्कार केला, त्यांची चौकशी केली की त्यांच्या पायाला काही लागले तर नाही ना. विष्णु भगवानांचा हा विनम्र आणि सहनशील स्वभाव पाहून भृगु ऋषी आश्चर्यचकित झाले. त्यांनी ओळखले की विष्णु भगवान हेच सर्वात श्रेष्ठ देवता आहेत, कारण त्यांनी क्रोधाचे शांततेत रूपांतर केले.

या कथेवरून असे सिद्ध होते कि, भगवाना विष्णु हे सहनशीलता, करुणा आणि नम्रतेचे प्रतीक आहेत. यामुळे भृगु ऋषींचाही  अहंकार लोप पावला आणि भगवान विष्णु यांना श्रेष्ठ देवता मानले गेले.

धन्यवाद ! जर आपल्याला ही कथा आवडल्यास नक्की अपवोट करा.

वाचणं सुरू ठेवा

Avatar
लोड होत आहे...