काम सोडण्याचा अर्ज एवढा काही अवघड नाहीये. हा अर्ज लिहिताना आपली मत काय आहेत, आपण जॉब का सोडत आहात हे त्यात स्पष्टपणे मांडा आणि तुमच्या मैनेजरला कळेल, त्या भाषेत मांडा.
मजकुरामध्ये आपण कामावर रुजू झाल्याची तारीख, कामाचा कालावधी आणि सोडल्याची तारीख टाकायला विसरू नका, कारण यामुळे आपल्याला दुसरीकडे जॉब मिळण्यास मदत होईल.
आता सुरुवात करूया,
प्रति,
मॅनेजरचे नाव,
कंपनीचे नाव,
पत्ता.
दिनांक: अर्जाचा दिनांक
विषय: नोकरी सोडण्यासाठी अर्ज
आदरणीय महोदय,
मी [तुमचे नाव], आपल्या कंपनीत [आपले पद] म्हणून काम करत आहे. मी आपल्या कंपनीत [आपल्या कामाचा कालावधी] पासून काम करत आहे. मला आपणास कळवायचे आहे की मी [तारीख] पासून आपल्या कंपनीतून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मी हा निर्णय [नोकरी सोडण्याचे कारण] घेतला आहे. मी आपल्या कंपनीत काम करताना खूप काही शिकलो आहे आणि आपल्या सर्वांचे सहकार्य मला नेहमीच लाभले आहे. यासाठी मी आपला मनःपूर्वक आभारी आहे.
कृपया माझा अर्ज आपण स्वीकारावा ही विनंती. धन्यवाद.
आपला/आपली विश्वासू,
आपले नाव,
संपर्क क्रमांक,
ईमेल अड्रेस.
लक्षात ठेवा, अर्जात नम्र भाषा वापरा, उद्धट भाषा वापरू नका.
वाचणं सुरू ठेवा
विशेष कार्यकारी अधिकारी (Special Executive Officer) हा एक महत्वाचा सरकारी अधिकारी असतो, त्याची नेमणूक राज्य किंवा केंद्र सरकार करतं. त्यांचे मुख्य काम म्हणजे प्रशासनातील विशेष कामांमध्ये मदत करणे, जसे की निवडणूक व्यवस्थापन, कायद्याची अंमलबजावणी किंवा इतर महत्त्वपूर्ण सरकारी उपक्रमांचे निरीक्षण आणि देखरेख करणे हे असते. हे अधिकारी सामान्यत: विशिष्ट काळासाठी नियुक्त केले जातात आणि त्यांच्याकडे विशिष्ट अधिकार असतात, जेणेकरून ते आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडू शकतील.
धन्यवाद!!!
वाचणं सुरू ठेवा
नवीनतम फीड मिळवा?